कांगयात्सेच्या कन्या 
                                    
                                                                      टीम कांगयात्से
                                                                                                             २३ ऑक्टोबर २०२१
                                    
                            ‘गिरिप्रेमी’ ह्या पुणेस्थित गिर्यारोहणात अग्रेसर संस्थेतर्फे लदाख भागातील कांगयात्से १-२ आणि गढवाल हिमालयातील गंगोत्री-१ या हिमशिखरांवर महिला संघांच्या मोहिमा ठरवण्यात आल्या. सर्वांना आपल्या कुवतीप्रमाणे संधी मिळावी म्हणून हिमालयातील या दोन्ही मोहिमा अशी योजना आखली गेली. या अति उंचीवरील खडतर मोहिमांसाठी महिला गिर्यारोहकांची निवड ही त्यांची गिरिप्रेमीच्या गुरुकुलातील उपस्थिती, सरावातील सातत्य, संघ …